Maharashtra

सेक्स पॉवर वाढविण्याच्या औषधाच्या नावाने लाखोचा गंडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सेक्स पॉवर वाढविण्याबरोबरच अनेक आजारांवर असलेले रामबाण औषध उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने देशातील अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱया नायजेरियन टोळीचा व्ही.पी.रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्या टोळीतील एका महिलेला नवी मुंबईतून रंगेहाथ बेडय़ा ठोकण्यात आल्या.

व्ही.पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा प्रकाश देवासी (21) हा त्याच्या वडिलांना व्यवसायात हातभार लावतो. त्याला मार्वे नाना नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि आमचा हर्बल प्रोडक्ट आयात-निर्यात करण्याचा व्यवसाय असून त्यासाठी हिंदुस्थानात सप्लायर म्हणून तुमची निवड करीत आहोत, असे सांगितले.

आमची वामे केटनरी कंपनी परदेशात हर्बल प्रोडक्ट निर्यात करते, असे प्रकाशला सांगण्यात आले. याकामासाठी प्रकाशने होकार देताच मार्वेने त्याला हिमाचल प्रदेशातील मोहम्मद हर्बल इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीचा ई-मेल आणि संपर्क क्रमांक देऊन त्यांच्याकडून एक लिटरचे लिक्विड घेऊन आम्हास देण्यास सांगितले.

त्यानुसार प्रकाशने अडीच लाखांना ते लिक्विड घेतले. मार्वे नाना ते लिक्विड पाच लाखांत खरेदी करणार होता. त्यामुळे प्रकाशची लालसा वाढली आणि लालसेपोटी आणखी दहा लाखांची ऑर्डर दिली.

ते हर्बल लिक्विड म्हणजे निव्वळ पाणी असून बाकी काही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नायजेरियन टोळी बनावट कंपन्या तयार करून त्या वैंपन्यांच्या नावे बनावट ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक तसेच बँक खाते खोलून अनेकांना लाखोंचा गंडा घालतात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close