Ahmednagar NewsBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : शेळ्या चारण्यासाठी गेल्या तीन मुली शेतात, दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे, पाडाळणे येथील खैरेवाडा बंधायात तीन अल्पवयीन शाळकरी मुली बुडाल्या.

या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक बचावली आहे. तिला नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आज दुपारी ही घटना घडली.

याबबत सविस्तर माहिती अशी कि पाडाळणे गावच्या शिवारात खैरेवाडी बंधारा आहे.

शनिवारी दुपारी कोमल भिका अस्वले (वय १५), सुवर्णा रामनाथ शेंगाळ (वय १३), शुभांगी रामनाथ शेंगाळ (वय १५ )

या शाळकरी मुली शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्या होत्या. दुपारी त्यांना तहान लागल्याने त्या बंधा-याकडे गेल्या होत्या.

तेथे पाणी पित असताना सुवर्णा शेंगाळ, कोमल शेंगाळ पाण्यात पडल्या.

त्या बुडत असल्याचे पाहून तिची बहीण शुभांगी शेंगाळ हिने तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. यावेळी तिने मदतीसाठी आरडाओरड केली.

हे ऐकून जवळ असलेल्या तरूणांनी घटनास्थळी येऊन या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील कोमल व सुवर्णा या दोघी पाण्यात बुडून मयत झाल्या.

परंतु शुभांगी हिला वाचविण्यास यश आले. शुभांगी शेंगाळ हिची प्रकृती चिंताजनक आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close