इंदोरीकर महाराजांबाबत अमृता फडणवीस म्हणतात …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे काही व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. त्यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखत असल्याचे दिसून आले. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण त्यांनी महिलांचा आदर कमी होईल, अशी विधानं करू नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या त्यांनी इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य केलं. मला इंदोरीकर महाराजांबद्दल आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात, असं सांगतानाच लोकांवर प्रभावपाडणार्‍या लोकांनी आपल्या मतांचा लोकांवर अधिक प्रभाव पडतो, याचं भान ठेवायला हवं, असंही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर चौफेर मतं मांडली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात महिला मुख्यमंत्री होण्याचं पोटेन्शियल असल्याचं त्या म्हणाल्या. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment