Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : आदिवासी समाजाच्या तरूणीचा मृतदेह सापडला,मृत्यूबाबत घातपाताचा संशय

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यात जागतिक महिला दिनीच गर्दणी, खानापूर येथे आदिवासी समाजाच्या तरूणीचा मृतदेह काटवनात सापडला. देवबाई पांडू गिऱ्हे (२४) असे या तरुणीचे नाव आहे. ही घटना म्हणजे आत्महत्या की खून, याबद्दल ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.

लोणी येथील रूग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. देवबाई शनिवारी सकाळी ११ वाजता शेळ्या चारण्यासाठी खानापूर शिवारात गेली होती. सायंकाळी ६ वाजून गेले, तरी ती परत घरी आली नाही, म्हणून धोंडीबा पांडू गिऱ्हे यांनी तिचा शोध घेतला. काटवनात ती मृतावस्थेत आढळली. 

या महिलेचा नेमकी अकस्मात मृत्यू झाला की, खून याचा तपास पोलीस करीत आहेत. रविवारी सकाळी ७ वाजता धोंडीबा पांडू गिऱ्हे यांच्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत देवबाई गिऱ्हे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान रानात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. मात्र ती सायंकाळी घरी आली नाही. म्हणून घरच्यांनी तपास केला असता रात्री उशिरा तिचा मृतदेह काटवनात आढळून आला. या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button