Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात गेलेल्या महिलेवर तोंडात बोळा कोंबून बलात्कार आणि नंतर केला खून !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिचा खून करण्यात आल्याचंही पुढे आलं आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात एका पडीक शेतातील असलेल्या झाडाखाली एका ३२ वर्षीय महिलेवर नराधम आरोपीने तोंडात बोळा कोंबून बलात्कार केला, व त्यानंतर महिलेचा खून केला आहे.

याबबत सविस्तर माहिती अशी कि,सात तारखेला शेळ्या चारण्यासाठी ही तरुणी घराबाहेर पडली होती. तेव्हा हा माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रसंग घडला आहे.

ही तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. ती पुन्हा परतलीच नसल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यानंतर 8 मार्चला तिचा मृतदेहच आढळून आल्याने धक्का बसला आहे.  

रात्रभर या तरुणीचा शोध सुरू होता सकाळी तिचा मृतदेह खानापूर परिसरातील झुडुपात सापडला. तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचा गुन्हा अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचे धोगेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी खास पथक तयार केलं आहे. हे पथक आरोपींचा शोध घेणार आहे. हा कट होता का? परिसरातल्या काही जणांनी हे कृत्यू केलं की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी ही हत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुली आणि वयोवृद्ध आजीवरही अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button