कोरोनाची दहशत : ‘त्या’ परदेशी नागरिकांमुळे अहमदनगरकरांमध्ये घबराट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसपासून होणाºया आजाराची दहशत अहमदनगर शहरातही दिसून येत आहे.

रेल्वे स्टेशन भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या परदेशी नागरिकांमुळे नगरकरांमध्ये घबराट पसरली आहे.

करोनाच्या भितीने नगरकर त्या पर्यटकांना हुसकावून लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या भागात सुरू असलेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात या पर्यटकांनी फोटोसेशन केले. त्या वेळी त्यांना पिटाळून लावण्यात आले.

हे परदेशी पर्यटक इटलीतून आल्याची चर्चा आहे. इटलीमध्ये करोनामुळे 60जणांचा बळी गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगरकरामध्ये करोनाची भिती पसरली आहे.

दरम्यान अहमदनगर शहरात अद्याप कोणीही कोरोना व्हायरसने बाधित आढळून आलेला नाही.

लहानांपासून तर वृद्धापर्यंत कोरोना व्हायरसचीच चर्चा शहरात दिसून येत आहे. अनेक नागरिक बचाव म्हणून मास्क घालताना दिसून येत आहेत.

कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केला असून आतापर्यंत रुग्णाची संख्या 39वर पोहोचली आहे.

केंद्र सरकारकडून कोरोना व्हायरस संक्रमित होऊ नये यासाठी आवश्यक ती कशी काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली जात आहे.

इतकच नाही तर सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment