Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrimeMaharashtra

अखेर ‘त्या’ खुनामागील रहस्य उलगडले या कारणामुळे झाला होता तरुणाचा खून !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- पाटाच्या कडेला आढळून आलेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात शिर्डी पोलिसांना यश मिळाले आहे. सोमनाथ चांगदेव गुंजाळ , वय २५ , रा . रामपूरवाडी , ता . राहाता असे शिर्डी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना पोलिसांनी जलदगतीने तपास करून पाच दिवसाच्या आत या प्रकरणाचा लावला. याबाबत शिर्डी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , दि . ४ मार्च रोजी नांदी येथील श्रीकृष्ण मंदिरालगत पाटाच्या कडेलाएक मृतदेह आढळून आला होता.

याबाबत शिर्डी पोलिसांत पोलीस पाटील सोमनाथ वाणी यांनी खबर दिली होती. घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोनि दीपक गंधाले , मिथुन घुगे , प्रविण दातरे , उपनिरीक्षक संजय सोनवणे , बारकू जाणे आदींनी भेट दिली होती.

तपासादरम्यान कोन्हाळे येथील सुनील अशोक मुर्तडक याचा मृतदेह असल्याचे समजले. मृतदेहाच्या डोक्यात झालेल्या जखमा पाहता रात्री कोणीतरी त्याच्या डोक्यात हत्याराने वार करून त्याचा खून केला असावा , असा संशय व्यक्त करण्यात येत होता.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी सोमनाथ चांगदेव गुंजाळ , वय २५ , रा . रामपूरवाड याच्याबद्दल जास्तच संशय बळावल्याने त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्यात आली.

त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तर दिली. परंतु वाघचौरे यांनी त्यास विश्वासात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. संशयित आरोपी गुंजाळ हा कोन्हाळे येथील हॉटेल पालवी येथे मॅनेजर आहे. दि . ३ मार्च रोजी रात्री दारू देण्याच्या कारणावरून झालेल्या याचाबाचीतून गुंजाळणे हा खून केला.

मुर्तडक यास नांदुर्थीच्या पाटाजवळ आणले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत कालव्याच्या पाण्यात टाकल्याचे निष्पन्न झाले. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुंजाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button