महिलादिनीच अहमदनगरमध्ये भयंकर घटना ! जबर मारहाण करत ७५ वर्षांच्या वृध्देवर अत्याचार,तोंडात बोळा कोंबून आरोपी फरार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभरात मोठ्या धुमधडाक्यात जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच एका ७५ वर्षांच्या वृध्द महिलेवर अत्याचार केल्याचा अत्यंत दुर्दैवी व गंभीर प्रकार नगर तालुक्यातील आंबिलवाडी येथे घडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , काल सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . त्यातून महिलांची असलेली महती सांगितली जात होती.

तर नगर तालुक्यातील “आंबिलवाडी येथील एका ७५ वर्षांच्या वृध्द महिलेवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली.त्यानंतर या महिलेला जबर मारहाण करण्यात आली आणि तोंडात बोळा कोंबून आरोपी फरार झाला.

ही घटना घडल्यानंतर 12 वाजता पोलिसांना फोन केला होता. मात्र पोलीस त्यानंतर तब्बल 6 तासांनी आल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

पीडितेला उपचारासाठी अहमदनगर सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून याबाबत रात्री उशिरापर्यंत नगर तालुका पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment