Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCivic

घरात घुसून तलवारीने कापून टाकण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह24 टीम / नेवासा :- तालुक्यातील चांदा येथे राहणारे साहेबराव दगडू फुलमाळी हे त्यांच्या घरात असताना ५ जण घरात घुसले व तुम्ही येथे राहयचे नाही असे धमकावले.

मी येथेच राहणार माझ्या नावावर घर आहे असे म्हटल्याने साहेबराव फुलमाळी यांना ५ जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून डोके फोडले.

पत्नी सौ फुलमाळी ही भांडणे सोडविण्यास आली असता तिलाही मारहाण केली. घरातील सामानाचे नुकसान करून तुम्ही आमच्या नादी लागलेतर तलवारीने कापून टाकू , असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

जखमी फुलमाळी यांच्या फिर्यादीवरुन आरोपी माणिक अण्णा आव्हाड , बाळू माणिक आव्हाड , जनाबाई बाळू आव्हाड , शांताबाई माणिक आव्हाड रा . चांदा , गुलाब अण्णा इंगळे , रा जेऊर हैबती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button