अत्याचार पिडीत ७५ वर्षीय वृद्ध आजी म्हणाल्या आता जगायची इच्छा राहिली नाही,अशी वेळ कुणावरही येवू नये…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- रविवार दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी नगर तालुक्यातील आंबिलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना घडली.शेतात काम करत असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर २७ वर्षाच्या तरूणाने अत्याचार केला. या आघाताने बेशुद्ध पडलेल्या सदर पिढीत महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या महिलेची सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या पिढीत महिलेच्या प्रकृतीची विचारणा केली असता त्या महिलेने आपल्या वेदना व्यक्त केल्या. यावेळी वाल्मिक नागवडे, सरपंच नाथाभाऊ शेटे, बाळासाहेब उगले, ऋषिकेश गायकवाड,मोहनराव भिंताडे सह गावातील नागरिक उपस्थित होते.

आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत माझ्यावर ओढवलेले संकट अतिशय वेदनादायी आहे.आयुष्य जगताना अनेक संकटे आली त्यांना धीराने तोंड देत या संकटांवर मात केली.पण ही दुर्दैवी घटना माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना असून अशी वेळ कुणावरही येवू नये या घटने मुळे मला जगायची इच्छा राहिली नाही.अशी भावना अत्याचार पिडीत ७५ वर्षीय वृद्ध महिलेने व्यक्त केली.

यावेळी शेलार म्हणाले हे सर्व पाहून फार वेदना होतात. समाजात अशा घटना दुर्दैवी आहेत. या नराधमाला कडक शिक्षा झालीच पाहिजे. राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी आजच सांगितले की महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करण्यात येईल. समाजासाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे याचा निषेध करण्यासाठी सगळ्या समाजाने संघटीतपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment