कोरोना व्हायरस पासून बचाव करायाचा असेल तर ही माहिती वाचाच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे, महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सात महत्वाच्या गोष्टी, वाचा आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करा.

1) साबणाने स्वच्छ हात धुवा
 जास्तीत जास्त वेळा साबणाने स्वच्छ हात धुवा. यामुळे हातावरील विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ते उपयोगी ठरतं.

2) सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
सर्दी, खोकला झाल्यास आपला संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी योग्य प्रकारे वापर करा.

3) सर्दी, आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका
जर तुम्हाला ताप, सर्दी असेल किंवा श्वसनास त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा.या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. 
4) बाथरुम स्वच्छ ठेवा
तुमच्या घरातील बाथरुम स्वच्छ ठेवा, बाथरुमची स्वच्छता करताना शॉवर डेटॉलसारख्या औषधी द्रव्याने जरुर स्वच्छ करा. 
5)मोबाईल स्क्रीन स्वच्छ ठेवा
स्मार्टफोनच्या स्क्रीनला डिसइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. या वाइप्समुळे मोबाईलच्या वरील भागावरील किटाणू मरतात. 
6) नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नका

वारंवार नाक, तोंड, डोळ्यांना हात लावल्याने हातावरील विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.त्यामुळे त्यांना जास्त हात लावू नका.

7)   सुरक्षित अंतर राखा
आपल्या आसपासच्या लोकांमध्ये किमान 3 फूट अंतर ठेवा. विशेषतः ज्यांना सर्दी खोकला असेल अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment