हास्यास्पद : राजेंद्र नागवडे यांनी कोरोना व्हायरसवर शोधला ‘तपकीर ओढण्याचा’ जालीम उपाय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.दरम्यान या जीवघेण्या अश्या कोरोना या विषाणूवर तपकीर ओढणे हाच जालीम उपाय असल्याचा शोध श्रीगोंद्यातील भाजपनेते राजेंद्र नागवडे यांनी लावला आहे.

याबाबत त्यांनी स्वतःची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली असून त्यात त्यांनी तपकिरीचा दावा केला आहे.त्यांच्या दाव्यावर ते ठाम आहेत.मात्र सोशल मिडीयावर याबाबत त्यांची खिल्ली उडविली जात असून नागवडे यांना ट्रोल केले गेले आहे.  

नागवडे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जुन्या काळात तपकीर ओढली जायची असं सांगत तपकीरीचा वापर कोरोनावर मात करण्यासाठी करता येऊ शकतो, असं म्हटलं आहे. “जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर या सर्वांना एक नम्र विनंती करुन आवाहन करत आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष आणि स्त्रिया तपकीर ओढायचे. तपकिरीमध्ये विशिष्ट प्रकारचा उग्र वास असतो. त्या वासामुळे कुठल्याही प्रकारचा जिवाणू किंवा विषाणू आपल्याला धोकादायक ठरत नाही.

त्यामुळे आपण सर्वांना यावर निश्चित विचार केला पाहिजे. ज्याला कोरोना विषाणुची बाधा झालेली आहे. त्या सर्वांना तपकिरीचा काही उपयोग होऊ शकतो का याचा विचार करायला हवा.

ज्यांना हा रोग होतोय त्यांना तपकीर दिल्यास त्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो का हे आपण सर्वांना तपासलं पाहिजे. यावर सर्व तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी आपले मनोगत नोंदवून यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतल्यास फायद्याचं ठरेल,” असं मत या व्हिडिओमध्ये नागवडे यांनी व्यक्त केलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment