अहमदनगर ब्रेकिंग : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण करत विष पाजले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेतात काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण करत विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेने सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून वावी पोलिस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कोपरगावच्या मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या या सोळा वर्षीय तरूणाला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.

नगर जिल्ह्याच्या सिमेवर राहणाऱ्या शरद क्षीरसागर यांचा मुलगा मंगळवारी मध्यरात्री आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता.

शेतात दबा धरून बसलेल्या चौघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला विष पाजलं. कशीबशी सुटका करून हा तरूण आपल्या घरी पोहोचला

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी माधव बाळासाहेब जोरे, वसंत निवृत्ती जोरे, नामदेव जोरे आणि शिवाजी जोरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव येथील मुळे हॉस्पिटलमध्ये तरुणाची मृत्यूशी झूंज सुरू असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर चारही आरोपी पसार झाले आहेत पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment