जाणून घ्या कोरोनाबद्दल सर्व काही माहिती लक्षणे, गैरसमज आणि उपचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोना व्हायरस म्हणजे काय ?- कोरोना हा एक जीव घेणारा विषाणू आहे. तो वेगाने वाढतो. वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जातो. आणि आपल्या श्वसनसंस्थेला बाधित करतो.

कसा होतो कोरोणाचा प्रसार ?

1) रूग्णांच्या खोकल्यातून-

  • रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात,
  • हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात,
  • या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात
  • आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यात त्याचा संसर्ग होतो.

2) वस्तूंच्या स्पर्शातून-

  • रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तू वैर पडतात
  • त्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात
  • त्यानंतर जर हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमार्गात जाऊन संसर्ग होतो.

    कोरोना आजाराची लक्षणे ;-

  • सर्दी
  • घसा तीव्रपणे दुखणे
  •  खोकला
  • ताप
  • श्वास घेण्यास त्रास होणे

  धोकादायक लक्षणे-

  •  तीव्र घसादुखी
  • ३८ अंशापेक्षा जास्त ताप असणे
  • धाप लागणे
  • छातीत दुखणे
  • खोकल्यावाटे रक्त पडण
  • रक्तदाब कमी होणं
  • नखे निळसर काळी पडणं
  • मुलांच्यामध्ये चिडचीड आणि झोपाळूपणा वाढणं

कोरोना धोका कुणाला?- 

    • गरोदर माता
    • उच्च रक्तदाब
    • मधुमेह
    • मूत्रपिंडाचे विकार
    • कर्करोग
    • दमा
    • जुना व सतत बळावणारा खोकला
    • कर्करोगाचे उपचार चालू असल्यास

कोरोनाआजाराची शंका आल्यास काय करावे ?

  • वेळ न दवडता मान्यताप्रत डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • जवळच्या सरकारी इस्पितळात जाऊन ‘कोरोना विधाणूच्या निदानाची तपासणी करून घ्या
  •  डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा ऐकीव माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका
  •  अशास्त्रीय उपचार, भोद इॉक्टरांचे उपचार घेऊ नका

कोरोना आजार टाळण्यासाठी घ्या ही काळजी !

  •  डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा
  • गर्दीची ठिकाणे टाळा
  •  चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
  •  सॅनिटायझर किंवा साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत
  • खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरावा.
  • टिशू लगेच कचरापेटीत टाकून द्यावा.
  •  खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये. त्याऐवजी कोपर वाकवन ने नो डामोर धारावी.
  • ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा
  • तम्ही या विषाणने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल आणि जर ताप
  • खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.
  • प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करू नये.
  • पूर्ण शिजवलेले शाकाहारी/ मांसाहारी अन्न खावे
  • चिकन, मटन प्रमाणित दुकानातूनच घ्यावे
  • तीन लिटर पाणी रोज घ्यावे
  • पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत
  • धूम्रपान टाळावे *
  • मद्यपान टाळावे

कोरोनाबाबत गैरसमज –

1 चिकन, अंडी खाऊ नयेत हे खोटं आहे.

  • पूर्ण शिजवलेल्या मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरू शकत नाही.
  • 55 अंशापेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंत राहत

2. चीनमधून आयात झालेल्या गोष्टी वापरू नयेत-

  •  आयात वस्तूतून विषाणू पसरत नाही
  • तरीही शंका असल्यास जंतुनाशक औषधांनी त्या धोवून घ्याव्यात
  • चीनमधून आयात उपकरणे, रंग, पिचकाऱ्या, पुस्तके यातूनही कोरोना विषाणू पसरत नाही
  •  शंका असल्यास निर्जतुक हॅण्डग्लोव्हज वापरावेत

3. लसून खाल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होत नाही-

  • हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे.
  • यासाठी कोणतेही संशोधन अस्तित्वात नाही.
  •  अशाप्रकारची कोणतीही वनस्पती अथवा औषध आजमितीला शास्त्रीय पद्धतीने मान्यताप्रत नाही.

4. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास रूग्ण मृत्यू पडतो-

  • आज भारतभरात केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने त्याप्रमाणे आय.एम.ए.च्या सदस्य डॉक्टरांनी अगदी पहिल्या दिवसांपासून हा आजार ओळखून त्याची निदान त्वरित करून रूग्णाला आवश्यक असल्यास त्याला इस्पितळात भरती करण्याबद्दल मोहीम राबवली आहे.
  • कोरोना विषाणूची बाधा झाली तर रूग्ण पूर्ण बरा होऊ शकतो
  • यात रूग्ण जगावण्याची शक्यता अत्यल्प आहे

लक्षात ठेवा-

  • कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरू नका
  • त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका
  • कोरोना विषाणूची साथ लवकरच पूर्ण आटोक्यात येईल

Leave a Comment