‘त्या’ बलात्कार प्रकरणात एका संशयितास अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील खानापूर शिवारातील काटवनात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महिलेचा मृतदेह रविवारी (८ मार्च) पहाटे दोन वाजता आढळला. या प्रकरणी अकोले पोलिसांनी बलात्कारासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शनिवारी (७ मार्च) सकाळी ११ वाजता पिराचीवाडी, खानापूर येथील ही महिला नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गेली होती.

या दरम्यान अज्ञात नराधमाने तिला फरफटत बाजूच्या काटवनात नेले व तिच्या तोंडात टॉवेलचा बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर तिचा अत्यंत निर्दयीपणाने खून करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment