देश पुढे गेला याचाच अर्थ शेतकरी पुढे गेला – सयाजी शिंदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / लोणी : देश पुढे गेला याचाच अर्थ शेतकरी पुढे गेला. देश मागे गेला याचाच अर्थ शेतकरी मागे गेला, अशा शब्दात देशाच्या प्रगतीशी असलेले शेतकऱ्यांचे नाते अभिनेता सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. 

प्रवरा ग्रामीण आरोग्य विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील अखिल भारतीय शुटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी लेखक अरविंद जगताप, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कुलगुरू वाय. एम. जयराज, सुवर्णाताई विखे पाटील, ध्रुव विखे पाटील आदी उपस्थित होते.

प्रवरा ग्रामीण आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने गोगलगाव येथील शिवमंदिर टेकडीवर देवराई उभारण्यासाठी यावर्षीपासून प्रयत्न करणार असल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.

दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत देशभरातील पुरुषांच्या ४४, तर मुलींच्या १३ संघांनी सहभाग घेतला आहे. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. संपत वाळुंज यांनी केले. सूत्रसंचालन सुनील गागरे यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment