विखेंसाठी सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘अपघाताने सत्तेवर आलेल्यांना आम्ही काय उत्तर देणार? पण त्यांनी लक्षात घ्यावे की राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूनेच कौल दिला असल्याने विखेंसाठी सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे,

असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार विखे यांनी पवारांना हे उत्तर दिले.

अजित पवार यांनी विखे पिता-पुत्रांवर टीका केली होती. त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना पवार म्हणाले, ‘विखेंना वाटले की सूर्य तिकडे उगवणार, पण तो इकडे उगवला.’ या बद्दल खासदार विखे यांना विचारले असता ते म्हणाले,

‘अपघाताने सत्तेवर आलेल्यांबद्दल आपण काय बोलणार? आमचा सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे. मधल्या काळात सत्ता येईल, या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश झाले होते. आम्ही मात्र शेवटपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलो.

मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी सूडबुद्धीने उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे आम्ही पक्षांतराचा निर्णय घेतला. आम्ही सत्तेच्या मागे धावणारे नाहीत. नगर जिल्ह्यातील मतदारांनी आम्हाला कायम स्वीकारले आहे.’

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment