Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

अहमदनगर जिल्ह्यातील या नदीचा झाला ‘नाला’ शेतकरी म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह24 टीम  / राहाता : शहरातील कात नदीवर अतिक्रमण झाले असून, ३०० फूट रुंदीच्या कात नदीचा नाला झाला आहे. सद्यस्थितीत ही कात नदी काही ठिकाणी फक्त चाळीस ते पन्नास फूट रुंदीची उरली आहे.

कात नदीची तातडीने मोजणी करावी, अशी मागणी राहाता येथील शेतकरी बांधवांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, साकुरी, राहाता, पिंपळवाडी या गावच्या परिसरातून जाणाऱ्या कात नदीचे पात्र हे इंग्रजकालीन आहे. त्याची रुंदी सुमारे तीनशे फुटाची आहे.

असे असताना आजमितीस नदीचे हे पात्र चाळीस ते पन्नास फूट रुंदीचे भरत आहे. या कात नदीवर दोन्ही बाजूच्या कडेने अतिक्रमण झालेले आहे.

याप्रकरणी वारंवार आंदोलन व उपोषण करून कात नदीच्या या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचेही या पत्रात शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close