Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कुकाणे :- चिलेखनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रवी चंद्रकांत कांबळे यांच्या फिर्यादीवरून रोहिदास भगवान गुंजाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

५ मार्चला रात्री रवी कांबळे व त्यांचा पुतण्या प्रशांत हे कुकाणे येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे अजिंक्य ससाणे व सुमित सरोदे यांच्याशी बोलत असताना रोहिदास गुंजाळ आला. निवडणुकीत विरोधात काम केल्यावरून त्याने वाद घातला.

रवीने त्याला समजावले, परंतु त्याने काचेचा ग्लास उचलून रवीच्या डोक्यात मारला. अजिंक्य व सुमित भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही रोहिदासने खाली पाडले. रवीचा पुतण्या प्रशांत यालाही मारहाण केली. हॉटेलमालक, मॅनेजर व इतरांनी सोडवणूक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close