Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtraSpacial

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यापाठोपाठ आज अहमदनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ माजली आहे

दुबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली.

त्यामुळं आता राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.

कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे.

दरम्यान मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील जिम, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा, चित्रपटगृहं, नाट्यगृहं तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना उद्धव ठाकरे यांनी या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं घेतलेल्या खबरदारींच्या उपायांची माहिती सभागृहाला दिली.

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईमधल्या शाळांबद्दल निर्णय अजून घेतला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर शहरातील ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही…

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close