Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

चर्चा बिबट्याची ! आणि प्रत्यक्षात निघाले …

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर :- तालुक्यातील आंबीखालसा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कान्होरे यांच्या शेतात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची चांगलीच धांदल उडाली होती.

त्यानंतर त्यांनी ऊस तोडण्याचेही थांबविले होते. मात्र, बिबट्याऐवजी या उसाच्या शेतातून रानमांजर निघाल्याने कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दोन दिवसांपूर्वीच आंबीखालसा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत दुचाकीवर हल्ला केला होता. त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी, तर दुसरी महिला बेशुद्ध पडली होती. याच बिबट्याच्या हल्ल्यातून तीन जण बालंबाल बचावले होते.

सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कान्होरे यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना बुधवारी दुपारी बिबट्या दिसला होता. त्यानंतर त्यांनी ऊस तोडण्याचे बंद केले होते. घटनेची माहिती वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गुरुवारी सकाळी याठिकाणी पिंजरा लावू, असे सांगितले होते.

गुरुवारी सकाळी थेटे यांच्यासह वन कर्मचारी पुन्हा उसाच्या शेतीजवळ गेले आणि त्यांनी कामगारांना ऊस तोडण्यास सांगितले. मात्र, कामगार ऊस तोडण्यास धजावत नव्हते. त्याच दरम्यान उसातून एक मोठे रानमांजर व एक पिल्लू बाहेर आले. रानमांजराला पाहून कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close