अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आजी-आजोबांकडे शेतात जात असताना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. ती गर्भवती असल्याचे समोर आल्यावर दोघांवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी विजय ऊर्फ दादा पोपट घुगे (२१ वर्षे, आनंदवाडी) याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झालेला अन्य आरोपी अल्पवयीन आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील तेरा वर्षांच्या मुलीवर दादा पोपट घुगे याने दोन महिन्यांपूर्वी मुलीच्या घरी व त्यानंतर ती शेतात आपल्या आजी-आजोबांकडे शेतात जात असताना बलात्कार केला.

आपल्या भावाच्या मदतीने मोटारसायकलीवर तो या मुलीस जवळच्या शेतात घेऊन गेला होता. हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुझ्या भावांना मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली होती. त्या भीतीपोटी मुलीने दोन महिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

संबंधित मुलगी घरात रडत असताना तिला आईने का रडते, असे विचारले असता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. नंतर मुलीला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती दीड महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पीडित मुलीने शुक्रवारी जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी व त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विजय याला लगेच अटक कण्यात आली आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment