अहमदनगर ब्रेकिंग : तीन कोरोना संशयीत रुग्णांनी जिल्हा रुग्णालयातून काढला पळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :  जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणुच्या संशयावरून उपचारासाठी दाखल असलेल्या तिघा रुग्णांनी पळ काढल्याची माहिती समोर आहे. या रुग्णांच्या शोधासाठी जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलिसांना पत्र दिले आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी याला दुजोरा दिला. जगभर कोरोनाचा कहर आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ वर गेला आहे. नगर जिल्ह्यात १  जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २० जण निरीक्षणाखाली आहेत. जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटलमध्ये विलिगिकरण कक्ष यासाठी स्थापन करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला बुथ येथील विलिगिकरण कक्षात हवलविण्यात आले आहे.

संशयित म्हणून असलेल्या काहींना जिल्हा रुग्णालयातील विलिगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याच कक्षातील आठ रुग्णांनी सायंकाळी साडेचार नंतर पळ काढला होती. ही बाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आली. त्यांनी संबंधित रुग्णांच्या कुटुंबियांना संपर्क साधला. त्यातील पाच रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यातील तीन रुग्ण अजून दाखल झालेले नाहीत.

या रुग्णांच्या शोधासाठी जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलिसांना पत्र दिले आहे. समाजाच्या दृष्टिने हे रुग्ण घातक ठरू शकतात, असे पत्रात म्हटले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ”या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील विलिगिकरण कक्षात उपचार घ्यायचे नव्हते. त्यांना खाजगी रुग्णालय हवे होते.

याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली आहे. त्यानुसार जुने दीपक हॉस्पिटल उपलब्ध केले आहे. डॉ. एस. एस. दीपक यांनी देखील शासनाला त्यांचे जुने हॉस्पिटल उपलब्ध करून दिले आहेत. हे रुग्ण निघून गेले होते, त्याची माहिती तोेफखाना पोलिसांना दिली आहे.” या आठही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे पाठविम्यात आले आहेत, असेही डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.

Leave a Comment