Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : संभाजी महाराजांचा पुतळा बसविणा-या दहा जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरातील प्रोफेसर चौकात रविवारी (दि़ १५) पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविला.

हे समजताच प्रशासनाने पुतळ्याचे पावित्र्य राखत तो काढून घेत सुरक्षित ठिकाणी हलविला. या घटनेनंतर प्रोफेसर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा यांच्यासह हिंदू राष्ट्र सेनेचे घनशाम बोडखे व महेश निकम, सागर ढुमणे, अनिकेत शियाळ यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी होत होती. परंतु त्यास प्रशासनाकडून दाद मिळाली नाही. सुमित वर्मा व घनश्याम बोडखे यांच्या पुढाकारातून रात्रीतून रविवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला.

ही बाब समजताच पोलीस, दंडाधिकारी यांचे प्रतिनिधी व महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी प्रोफेसर चौकात दाखल झाले.

विनापरवाना बसविण्यात आलेल्या पुतळ्याचे पावित्र्य भंग होऊ नये तसेच यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रविवारी पहाटेच पोलीस बंदोबस्तात या ठिकाणाहून पुतळा काढून घेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला.

अहमदनगर ब्रेकिंग : छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘तो’ पुतळा हटवला

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button