अहमदनगर ब्रेकिंग : छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘तो’ पुतळा हटवला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा महापालिका प्रशासनाने पोलीस बांदोस्तात हटवला आहे.

अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी होत होती.

परंतु त्यास प्रशासनाकडून दाद मिळाली नाही. सुमित वर्मा व घनश्याम बोडखे यांच्या पुढाकारातून रात्रीतून रविवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला.

दरम्यान पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

व महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला. खबरदारी म्हणून पोलिसांनी प्रोफेसर कॉलनी चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment