Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयितास झाला स्वाईन फ्ल्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत. 

नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे,

नगरमध्ये आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची परिस्थिती आता ठणठणीत आहे. जे हाय रिस्क संशयित रुग्ण होते त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान आठ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांपैकी एका रुग्णास स्वाईन फ्ल्यू झाला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली असून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शहरातील शाळा, महाविद्यालये, वस्तीगृहे, सिनेमागृहे, शासकीय कार्यालयातील बायोेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. 

रविवारी जिल्हा रुग्णालय येथे कोरोना आजारासंबंधित 27 जणांची तपासणी करण्यात आली. 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यातील आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 11 जणांचे रिपोर्ट लवकरच मिळणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close