अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा मृतदेह आढळला.. खून की आत्महत्या?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- बिरोबानगर-बारागाव नांदूर रस्त्यावर राहणाऱ्या साक्षी संदीप तोरणे (वय २१) या महिलेचा मृतदेह राहत्या घरात रविवारी सकाळी आढळला.

ही महिला गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीसमवेत राहात होती.

तिचा खून करण्यात आली की, तिने आत्महत्या केली हे समजू शकले नाही. पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत.

त्यांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला, मात्र उशिरापर्यंत उकल होऊ शकली नाही.

राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ही महिला नेमकी कोणासमवेत येथे राहत होती याचा शोध सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment