Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

‘या’ कारणामुळे झाली अहमदनगर जिल्ह्यातील त्या शिवसैनिकाची हत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव ;- तालुक्यातील भोजडे चौकी परिसरात गिरे वस्ती येथे राहणारे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिरे (वय ३८) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रविवारी (दि. १५) सायंकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील भोजडे चौकी परिसरातील गिरे वस्ती येथे राहत असलेले शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश गिरे हे रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरात चहा पित होते. यावेळी गिरे वस्तीवर स्विफ्ट कारमधून पाच-सहा जण व पल्सर गाडीवरून दोघे आले.

या अज्ञातांनी घरात प्रवेश करून चहा पित असलेल्या सुरेश गिरे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. मारेक­ऱ्यांनी एकूण सहा गोळ्या झाडल्या होत्या. पैकी चार त्यांच्या अंगात शिरल्या, तर दोन बाजूला सापडल्या. यावेळी घरात मयत सुरेश गिरे यांचे वडील होते.

सायंकाळची वेळ असल्यामुळे घरातील महिला स्वयंपाक खोलीत होत्या. अचानक हल्ला झाल्यामुळे कोणालाही काही कळाले नाही. हल्लेखोर आले तसे निघून गेले. मयत सुरेश गिरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला.

सुरेश गिरे हे घरातील कर्ते होते. हल्लेखोरांनी आधी दरवाजा आणि खिडकीवर गोळीबार केला. गिरे यानं स्वतःचा बचाव करण्यासाठी घराच्या मागील दाराने पळ काढत शेताकडे धाव घेतली.

मात्र, मारेकऱ्यांनी त्याला गाठले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गिरे याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते आणि तो तडीपार होता. त्यानंतर तो गावी राहत होता.

काही दिवसांपूर्वी मुरूम वाहतुकीतून वाद झाले होते. त्यावेळी गिरे यानं एकाला मारहाण केली होती. त्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close