Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड भुतवडा तलावात बुडून अश्रू उत्तम डोंगरे (वय ५६) यांचा मृत्यू झाला.

चार दिवसांनंतर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

गळ्याभोवती टॉवेल व दगड बांधलेला होता. डोंगरे यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डोंगरे हे १३ रोजी भुतवडा तलावाशेजारी पांडववस्ती येथील घरातून बाहेर पडले होते.

सायंकाळी ते घरी आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, सापडले नाहीत.

सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह भुतवडा तलावात स्थानिक लोकांना आढळला.

गावातील गौतम देवराव डोंगरे, बाबू युवराज डोके यांनी तलावातून मृतदेह बाहेर काढला.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. गळ्याभोवती टॉवेलमध्ये दगड बांधलेला आढळला. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button