Ahmednagar NewsAhmednagar South

कोरोना व्हायरस …..डरो मत चायना मेड है !

श्रीगोंदा : कोरोना व्हायरस …..डरो मत चायना मेड है असा व्यंगचित्राच्या माध्यमातून संदेश देण्याचे काम श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील व सध्या नगर येथे वास्तव्यास असणारे प्रसिद्ध चित्रकार हेमंत दंडवते यांनी दिला आहे .

सध्या जगभर धुमाकुळ घालणारा , महासत्तांना हतबल करणारा , भल्याभल्यांना घरात बंदिस्त करून ठेवणारा , जगावर अधिराज्य गाजवू पहाणाऱ्यांना जमिनीवर आणणाऱ्या कोरोना या व्हायरसने जगाची झोप उडवली आहे .

यामुळे सर्वत्र भितीचे , दहशतीचे वातावरण पसरले आहे . अशातच सोशल मिडियावरुन समाजात अनेक प्रकारचे गैरसमज ,अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे . त्यामुळे प्रत्येक जण घाबरलेल्या स्थितीत आहे .

पण प्रसिद्ध चित्रकार हेमंत दंडवते यांनी चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत कोरोना व्हायरसचे पाच मिनिटात व्यंग चित्र काढले आहे . यातून त्यांनी ‘ आजाराला घाबरू नका , त्याचा मुकाबला करा , तो जास्त काळ टिकणार नाही ‘असा मोठा संदेश नागरिकांना दिला आहे .

शिवाय कोरोना हा चायना मेड आहे व चायना मेड वस्तू म्हणजे डुप्लीकेट त्या जास्त काळ टिकत नाहीत हा भारतीयांचा असणारा अनुभव याची आठवण करून देताना चायना मेड कोरोनाला व्यंगचित्रात भारत ठोसा मारताना दाखवले आहे .

लवकरच हे देशावर आलेले संकट टळेल.नागरिकांनी काळजी न करता काळजी घ्यावी व आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे हा सामाजिक संदेश हेमंत दंडवते यांनी व्यंगचित्र माध्यमातून दिला आहे .

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close