‘त्या’ विधानानंतर राजेंद्र नागवडे झाले सिरीयस आता म्हणतात….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदा : कोरोना विषाणू फैलाव शहरी भागात अधिक आहे. तुलनेने ग्रामीण भागात कोरोनाचा धोका कमी आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोनाचा प्रसार रोखला जाऊ शकतो. यामुळे कोरोनाला घाबरू नका, पंरतु योग्य ती खबरदारी घ्या, असे अवाहन नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

काही दिवसापूर्वी  नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी तपकीर ओढणे हा करोनावरील जालीम उपाय असल्याचा दावा केला होता . त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ क्लिप आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केली होती. या नंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून टीका होऊ लागली होती.

यावेळी बोलताना नागवडे म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार हा सार्वजनिक संपर्क आणि गर्दीतुन होतो. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोनाच्या प्रसाराची साखळी तोडली जाऊ शकते.

गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, शक्य असतील तेवढी कामे घरातून करावीत, असे आवाहन करीत नागवडे म्हणाले, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. परंतु, सुट्टी आहे प्रवास किंवा पर्यटन करण्याचा पर्याय निवडू नये. त्याचबरोबर लग्न समारंभ किंवा गर्दी ठिकाणी जाणे टाळावे.

नागवडे पुढे म्हणाले, सर्वांनी खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाला समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. पुढील महिनाभर सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक प्रवास टाळा, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी सहसा जाऊ नका.

तसेच आरोग्य विषयक समस्या जाणवल्यास तत्काळ दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन करीत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नागरिकांना कोरोनाला घाबरून न जाता स्वतःची त्याचबरोबर समाजाची काळजी घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

Leave a Comment