अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर कोयत्याने हल्ला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एक माथेफिरूने महिलेवर कोयत्याने वार केले.

महिलेच्या आईलाही ढकलून देत मारहाण केली. बुऱ्हाणनगर येथील गुगळे कॉलनीत सोमवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी किशोर भुजंग (भोसले आखाडा, नगर, हल्ली राहणार स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीत स्मिता किशोर वाव्हळ (स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) जखमी झाल्या आहेत.

भुजंग रात्री वाव्हळ यांच्याकडे आला. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, असे म्हणून तो शिवीगाळ, दमदाटी करू लागले. त्याने हातावर कोयत्याने वार केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment