नगर-मनमाड महामार्गावर थरार : चोरांचा पाठलाग करताना पोलिसांसोबत झाले असे काही .

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर-मनमाड महामार्गावर डिझेलचोरांचा पाठलाग करताना आज पहाटे शहरात वाहन उलटून झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

या अपघाताचा फायदा घेत चोरांनी मात्र धूम ठोकली. हवालदार नारायण ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून, पोलीस नाईक सोमनाथ जायभाये यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

नगर-मनमाड महामार्गावर मंगळवारी (ता. १७) गस्त घालताना राहुरीतील मारुती शोरूमसमोरील ट्रकमधून काही जण डिझेलचोरी करीत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांना खबऱ्याकडून मिळाली.

त्याचवेळी एक मोटार (एमएच १४ बीटी ८४२२) कोल्हारकडे भरधाव जाताना पोलिसांना दिसली. उपनिरीक्षक शेळके यांनी तिचा पाठलाग सुरू केला. राहुरीत गस्त घालणारे हवालदार ढाकणे, पोलीस नाईक जायभाये, चालक पथवे यांना कळवून त्यांनाही पाठलाग करण्यास सांगितले.

बेलापूर फाटा फिक्­स पॉईंटवरील हवालदार गौतम लगड व गणेश फाटक यांनाही नाकाबंदी करण्यास सांगितले. नाकाबंदीला न जुमानता मोटार वेगाने कोल्हारच्या दिशेने गेली. चिंचोली फाटा येथून दुभाजक ओलांडून राहुरीच्या दिशेने मागे फिरली.

उपनिरीक्षक शेळके यांनी हवालदार ढाकणे यांना सतर्कतेने पाठलाग करण्यास कळविले. पोलीस नाईक जायभाये यांनी त्यांच्या खासगी मोटारीतून (एमएच १६ बीवाय ४३००) बेलापूर फाटा ते राहुरीदरम्यान पाठलाग केला.

दरम्यान, चार स्थानिक नागरिक दोन दुचाकीवर पोलिसांच्या मदतीसाठी पाठलाग करीत होते. त्याचवेळी चोरांनी मोटारीतील डिझेलने भरलेला ३५ लिटरचा ड्रम रस्त्यावर फेकून दिला. रस्त्यावर सर्वत्र डिझेल पसरले.

त्यामुळे हॉटेल सर्जासमोर रस्त्यावरील डिझेलवरून पोलिसांची खासगी मोटार घसरून बाजूच्या शेतात जाऊन उलटली. त्यात हवालदार ढाकणे गंभीर तर जायभाये किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले.

पोलिसांना मदत करणारे दुचाकीस्वारही रस्त्यावरून घसरल्याने किरकोळ जखमी झाले. अपघाताचा फायदा घेऊन डिझेलचोर पसार झाले. जखमींना राहुरीतील खासगी दवाखान्यात हलविले. तब्बल तासभर हा सिनेस्टाईलने पाठलाग सुरू होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment