जाणून घ्या लॉकडाउन म्हणजे काय ? What is a lockdown ? read information in marathi

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी ठाकरे सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्य लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.आज आपण जाणून घेवूयात लॉकडाउन म्हणजे काय ? 

लॉकडाउन म्हणजे आपत्कालीन प्रणाली, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे लागू केली जाते. लॉक डाऊनच्या बाबतीत त्या भागातील लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसते.

या वेळेस कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर पडू शकत नाही.एखादा महाभयंकर आजार पसरत असताना किंवा आपत्तीच्या काळात सरकार लॉकडाउनची घोषणा करते.

ज्या ठिकाणी लॉकडाउन करण्या येतो तेथील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो.केवळ औषध, बँक, हॉस्पिटल, दुध -किराणा अशा अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंसाठीच बाहेर पडण्याची परवानगी असते.

का करतात लॉकडाऊन?

समाजात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉक डाऊन प्रणाली अंमलात आणली गेली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1241659180458471424

मा मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे
  • आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४* *कलम लागू
  • आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.
  •  जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
  • महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
  • रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.
  • जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
  • अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
  • बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
  • शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
  • आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
  • ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
  • चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.
  • ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल
  • सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद
  • अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती
  • पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

Leave a Comment