जगभरात कोरोनाचा कहर ! मृतांचा आकडा १९ हजारावर …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे.

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. २४ तासांत त्यात ५० हजार नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. 

इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही चीनपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे ३४३४ जणांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत गेले दोन दिवस प्रतिदिन १०० हून अधिक बळी गेले होते. पण मंगळवारी एकाच दिवशी अमेरिकेत २२५ बळी गेले.

एक-दोन दिवसांत स्पेन चीनलाही मागे टाकेल अशी शक्यता आहे. २४ तासांत स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा बळी गेला आणि मृतांची संख्या २९९१ वर पोहचली. स्पेनमध्ये गेला आठवडा भर प्रतिदिन मृतांची संख्या १०० पेक्षा जास्त असून अवघ्या ५ दिवसांत २१६० बळी गेले आहेत.

जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 85 हजाराहून अधिक आहे. यामुळे झालेल्या मृतांचा आकडाही 12 हजाराच्या आसपास गेला आहे. चीनमध्ये 81,008 कोरोना बाधित रुग्ण आहेत. असं असलं तरी चीनने तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आणली आहे.

चीननंतर इटलीत कोरोनानं सर्वाधिक लोकांचा बळी घेतला आहे. इटलीत आतापर्यंत 47,021 कोरोनाचे रुग्ण आहेत. तिथंही लॉकडाऊन करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment