अहमदनगर ब्रेकिंग : टारगटांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमुळे पोलीस जखमी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असून त्याच्या अंमलबजावणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त जिल्ह्यात तैनात आहे. या बंदोबस्ताच्या दरम्यान राहुरीमध्ये काही टारगटांनी पोलिसांवर दगडफेक केली.

यात पोलीस कर्मचारी दादासाहेब रोहोकले हे जखमी झाले आहेत. टारगटांच्या या दगडफेकीमुळे राहुरीमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची स्थिती आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना बळाचा वापर न करण्याच्या सूचना आणि नागरिकांनी आवाहन केले आहे. पोलिसांकडून सूचनांचे पालन होत आहे.

परंतु काही टारगट मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना त्रास देत आहे. राहुरीमध्ये काही टारगटानी मनोरंजनातून ही दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलीस आणि राहुरीकरांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

नगर शहरांमध्ये ही काही टारगट अशाच पद्धतीने पोलिसांना त्रास देत असल्याचे दिसते आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या टारगटांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पूर्ण झाली.

राहुरीमधील या प्रकारामुळे नगर जिल्ह्यामध्ये संचारबंदीवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment