अहमदनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले ! शेतकरी पुन्हा नव्या संकटात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बुधवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात आवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळं शेतकरी पुन्हा एका संकटात सापडला आहे.

काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंद्या तालुक्यास अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले असून यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. 

राहुरी तालुक्यातील लोणी, कोल्हार, बाभळेश्वर परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे या भागातील द्राक्षबाग, डाळिंब, गहू हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या भागातील विजही गायब झाली.

कर्जत तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. नगर शहरातील सावेडी, नागापूर आणि बोल्हेगाव परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे या भागातील वीज पुरवठाही बराच वेळ खंडित झाला होता. नेवासा शहर व परिसरात वादळी वाºयासह पाऊस पडला.

श्रीगोंद्यातील आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगाव, तांदळी दुमाला भागातील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले. अकोले तालुक्यातही काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर तालुक्यातील काही भागात मंगळवारी पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले असून, बुधवारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधारात आहेत.

करोना संसर्गामुळे संपुर्ण देश हादरुन गेला असून या महामारीपासुन बचाव करण्यासाठी नागरीकांना घराबाहेर न पडण्याचू आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शेतात काढणीसाठी आलेले पिके कापण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीत, अपेक्षीत साधनसामुग्री उपलब्ध होत नाही वाहतूक बंद झाली.

वाहनांसाठी इंधन मिळेना. शेतीतला भाजीपाला बाहेगावी विकता येत नाही. संपुर्ण बाजारपेठ ठप्प झाल्याने आर्थीक उलाढाल मंदावली. करोनाचे वातावरण शांत झाल्यानंतर शेतातील उभे पिक काढून त्याच्यावर दोन पैसे मिळण्याच्या आशेने बसलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग अंतच पहात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment