Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

गुढीपाडव्याला शनिशिंगणापूर मध्ये पहिल्यांदाच झाल अस काही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शनिशिंगणापूर :- गुढीपाडव्याला शनिशिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थान प्रशासनाने दर्शन बंद केले आहे.

सर्व दुकानेही बंद आहेत. गुढीपाडव्याला शनिशिंगणापूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने शनिदर्शनास येतात. काशी येथून काही भाविक हजारो किमी सायकलीवर प्रवास करून कावडीने शनिमूर्तीस जलाभिषेक करण्यासाठी पाणी आणतात.

शनिशिंगणापूर परिसरातील भाविकही प्रवरासंगम येथून गोदावरीचे पाणी कावडीने घेऊन येतात. परंतु यंदा कोरोनाची साथ असल्याने पाडव्याची यात्रा रद्द करून शनिदर्शन पूर्णपणे बंद होते.

काशीहून पाणी घेऊन आलेल्या कावडधारकांनाही नगर-औरंगाबाद राजमार्गावर अडवून हे पाणी स्वयंभू शनिमूर्तीवर टाकता येणार नाही, असे सांगून त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. प्रवरासंगम येथूनदेखील पाणी आणू नये, असे आवाहन सुरक्षा अधिकारी गोरख दरंदले यांनी केले होते.

गुढीपाडव्याचा सण नगर जिल्ह्यात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. संगीत मैफली आयोजित केल्या जातात. तथापि, कोरोनामुळे बुधवारी सर्वांनी आपल्या घरीच साधेपणाने हा सण साजरा केला.

पूजा करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यही अनेक नागरिकांना उपलब्ध झाले नाही. घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरून गुढी उभारण्यात आली. मिठाईची दुकाने बंद असल्याने घरच्या घरीच गोडधोड करून सण साजरा केला गेला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.