Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

सरपंचाला वाळूतस्करांनी लावला कट्टा ,दिली जिवे ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- वाळू वाहतुकीस विरोध केला म्हणून वाळूतस्करांनी जाफराबादचे सरपंच संदीप शेलार यांना गावठी कट्टा लावून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी रात्री घडली.

कोरोनामुळे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून प्रमुख रस्ते काट्याच्या साह्याने बंद केले आहेत. वाळू वाहतूक करणारा रामपूर (कोकरे) येथील पोपटी हिरव्या रंगाचा टाटा कंपनीचा ६०८ टेम्पो जाफराबाद गावाकडून जुन्या नायगाव रस्त्याकडे जात असताना चालक राजू गुंजाळ याने रस्त्यावरील काट्या काढून टेम्पो गावात आणण्याचा प्रयत्न केला.

सरपंच शेलार यांच्यासह काही ग्रामस्थांनी आमच्या गावातून गाड्या बंद करण्यात आल्या आहेत, असे सांगितले असता गुंजाळ याने शिवीगाळ केली. ही बाचाबाची सुरू असतानाच रामपूर येथील विशाल गुंजाळ, ऋतिक गुंजाळ, ऋतिक धनवटे, पवन उपळकर, सागर उपळकर हे इंडिका कारमधून,

तर इतर आरोपी मोटारसायकलीवरून आले. विशाल गुंजाळ याने सरपंच शेलार यांच्या पोटाला कट्टा लावून ‘तुझी कायमची किट किट असते, जास्त माजला आहे, तू आमच्या तक्रारी करत असतो, गाडी तर आम्ही याच रस्त्याने नेणार. तुला काय करायचे ते कर’, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत सरपंच शेलार यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.