Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

कोरोनावर मत करण्यासाठी आता शिर्डी देवस्थानही पुढे …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

 51 कोटींची आर्थिक मदत : शिर्डी देवस्थानच्या वतीने राज्य शासनाला 51 कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. न्यायलयाने नेमलेल्या कमिटीच्या निर्णयानंतर ही मदत राज्य शासनाकडे देण्यात येणार आहे.

संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि गरजू लोकांसाठी देवस्थानच्या वतीने मोफत अन्नदानही करणार आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग धंदे बंद असल्याने संपूर्ण राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाला आहे.

ताण कमी करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि व्यावसायिक आर्थिक मदत घेऊन पुढे सरसावले आहेत. त्यातच शिर्डी देवस्थाननेही 51 कोटींची मदत जाहीर केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close