Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : वीज पडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील करंजी, भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, चिचोंडी शिराळ, कोल्हार, जवखेडे या भागात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. आडगाव येथे एका तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गणेश रामनाथ लोंढे (वय १९) हा तरुण घरासमोर उभा असताना त्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

करंजी, भोसे, चिचोंडी शिराळ, मिरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा व मोसंबीच्या फळबागांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फळांचा जमिनीवर सडा पडला होता. वादळामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close