Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtraPoliticsSpacial

सुजयदादा अभिमान आहे आम्हाला तुमच्यासारखा खासदार भेटला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्णपणे लॉकडाऊन आहे. यामुळे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील संघातील विद्यार्थी, नागरिक इतर राज्यात अडकलेले आहेत.त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांचे आप्तस्वकीय मुळे तिकडे चिंतेत आहेत.

या पार्श्वभूमीवर इतर राज्यात असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा त्यांची व्यवस्थित सोय व्हावी या हेतूने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यासाठी दोन हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहे.

या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधून इतर राज्यात अडकलेल्या आपल्या आप्तस्वकीय बाबत माहिती कळवल्यास संबंधित राज्यातील खासदारांना मार्फत व्यवस्था करण्यात येईल.

त्यासाठी नागरिकांनी ह्यात हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन खा सुजय विखे पाटील यांनी आज एका व्हिडिओद्वारे केले.अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे झालेले पंचनामे तूर्तास करता येत नसतील तरीसुद्धा लवकरात लवकर नजीकच्या काळामध्ये सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांनी करून घ्यावेत अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

अहमदनगर येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल द्वारा २४ तास वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना जाण्याची अडचण असेल किंवा आरोग्य संदर्भात काही समस्या असतील त्या सर्वांनी संपर्क साधावा.

लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर पर राज्यातील नागरिकांना परतता येत नसेल अशा नागरिकांनी सुद्धा घाबरून न जाता हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधल्यास त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन डॉ. विखे पाटील यांनी दिले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close