Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingSpacial

अहमदनगर जिल्ह्यात 4 करोनाबाधीत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना पेशंट्स ची संख्या आता चार झाली आहे नगरमध्ये आढळलेले करोनाचे दोन्ही नवे रुग्ण हे विदेशी नागरिक आहेत. एक व्यक्ती फ्रान्सचा तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. काल हे दोन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत.

पहिला रुग्ण ‘करोना’मुक्त झाल्याचा आनंद सकाळी प्रशासनाने घेतला, पण दुपारी आणखी दोन नवे रुग्ण सापडल्याने प्रशासन अस्वस्थ झाले आहे. दरम्यान, ‘करोना’बाधित पहिल्या तीनपैकी दोन जण व नव्याने दाखल झालेले दोन अशा चौघांवर बूथ रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.

या दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रूप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. हा ग्रुप २ आठवडे दिल्लीत थांबला. नंतर त्यांनी मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासह केला. विविध ठिकाणांना भेटी दिल्या. १४ मार्चला रेल्वेने हे सर्वजण नगर येथे आले.

ते शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसऱ्या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते २६ मार्चपर्यंत होते. या व्यक्ती तेथे राहात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने या १४ जणांना ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पाठवले.

शनिवारी या १४ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले. त्यापैकी ५ स्त्राव नमुन्यांचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. त्यातील या दोन व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

इतर तीन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, उर्वरित ९ अहवाल अद्याप येणे बाकी आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून बाधित दोन रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधील आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात पाठवले जाणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close