अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे ते पेशंट्स राहिले तो शहरातील परिसर पूर्णपणे बंद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरात नव्याने सापडलेले कोरोनाचे पेशंट्स  मुंकूंदनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

तसेच औरंगाबादमार्गे जाणारी वाहतूक आज सकाळीच बंद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने औरंगाबाद महामार्गावरील पंचवटी हॉटेलपासून मुंकूदनगरकडे जाणारे रस्ते बॅरिकेट टाकून बंद करण्यास सुरुवात केली.

काही ठिकाणी बांबू बांधून रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिसांचा फौजफाटाही या परिसरात दाखल झाला आहे.

मुंकूदनगरमधील केरुळकर मळ्याकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे.

दर्गादायरा, न्यायनगर गोविंदपुराकडे जाणारे रस्तेही बॅरिकेट टाकून बंद करण्यात येणार आहेत.

या दोन व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासकीय यंत्रणेकडून घेतला जात आहे.

याशिवाय हे दोन्ही रुग्ण जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

यामुळे मुंकूदनगर येथील नागरिकांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून हा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment