ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ ०२ बाधित रुग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे रिपोर्ट्स निगेटीव्ह !

0

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  काल नगर जिल्ह्यात सापडलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील  एकूण २३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत .

दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रूप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. हा ग्रुप २ आठवडे दिल्लीत थांबला. नंतर त्यांनी मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासह केला.

Advertisement

विविध ठिकाणांना भेटी दिल्या. १४ मार्चला रेल्वेने हे सर्वजण नगर येथे आले. ते शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसऱ्या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते २६ मार्चपर्यंत होते.

या व्यक्ती तेथे राहात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने या १४ जणांना ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पाठवले.

Advertisement

शनिवारी या १४ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान नेवासे, संगमनेर आणि राहुरीमधून काही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे . एकूण ४९ व्यक्ती ताब्यात घेतल्या आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.

Advertisement
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

Advertisement

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Advertisement
li