अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयित तरुणी रुग्णालयात दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पनवेल येथून आलेल्या राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील कोरोनाचे संशयीत असलेली एक तरुणीस काल नगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

पुणतांबा येथील ही तरुणी पनवेल येथे कामास होती. ती काल रात्री एका टँकरने आली असल्याचे तिने सांगितले.

मात्र कोणत्या टँकरने आली आणि कुठे उतरली याबाबत स्पष्ट सांगितले नसल्याने याबाबतची चर्चा सुरु होती.

काल सकाळी तिला ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले असता तिच्यात कोरोनाचे काही लक्षणे आढळली.

पुढील उपचारासाठी तिला नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी काल दुपारी तिला रवाना करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीनंतर तिचा अहवाल काय येतो या नंतरच तिला कोरोना आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment