मुस्लीम धर्माच्या प्रसारासाठी आलेल्यांकडून अहमदनगर जिल्ह्यात झाला कोरोना व्हायरसचा प्रसार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेडमधील तिघा जणांना  कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालाने स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता आठ झाली आहे.

रविवारी (२९ मार्च) नगरमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या दोन विदेशी नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामधील एक व्यक्ती फ्रान्स, तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. या दोघांचे नगर शहरासह जामखेड येथे वास्तव होते.

धक्कादायक म्हणजे जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ‘करोना’बाधितांचे नगर व जामखेडमधील वास्तव्य धार्मिक उपक्रमांसाठी होते. त्यातही नगरला मुकुंदनगर येथे ते अवघी एक रात्र थांबले होते. मात्र, त्यांचा जामखेडमधील मुक्काम तब्बल १०-१२ दिवसांचा होता.

परदेशातून आलेल्या १४ पैंकी दोघांना कोरोना झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहिम सुरू केली. त्यात संगमनेर, नेवासा, जामखेड, राहुरी आणि नगर शहरातील ८० जण प्रशासनाला सापडले.

त्यांच्या स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील काही रिपोर्ट आज मिळाले. त्यात दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आता आणखी वाढली आहे. आता या दोघांचा संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.

जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्या होत्या. काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

मुस्लिम समाजातील  धर्म प्रचार व प्रसाराचे काम नियमितपणे सुरू असते व त्यासाठी बाहेरच्या देशांतून तज्ज्ञ येत असतात याच उद्देशाने परदेशातून (मॉरिशस) १४ जणांचा गट देशात आला होता. त्यात १० जण परदेशातील व चार जण देशातील असल्याचे सांगितले जाते.

धर्म प्रचार व प्रसार तसेच धार्मिक मार्गदर्शन करण्य़ासाठी परदेशातील ही मंडळी नगर जिल्ह्यात आली होती. नगरला ३ एप्रिलला औरंगाबाद रस्त्यावरील एनआर लॉनच्या परिसरात इज्तेमा या धार्मिक सत्संग कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते व त्यासंदर्भातही जनतेला मार्गदर्शनाचे त्यांचे नियोजन होते.

पण ‘करोना’मुळे गर्दी टाळण्याचे आवाहन असल्याने तसेच याच काळात आठवडे बाजारांसह बहुतांश धार्मिक स्थळे व धार्मिक उपक्रम रद्द झाले होते. त्यामुळे नगरचा जिल्हास्तरीय इज्तेमाही त्याच काळात रद्द झाला. पण यानिमित्ताने नगरला आल्यावर धार्मिक मार्गदर्शनाचे त्यांचे काम सुरू होते.

मॉरिशस येथून दिल्लीला आल्यावर ही मंडळी तेथे दोन आठवडे थांबली व या काळात त्यांनी मुंबई व चेन्नईला भेटी दिल्या आणि तेथून पुन्हा दिल्लीलाही ते गेले होते. १४ मार्चला रेल्वेने सर्व जण नगरला आल्यावर मुकुंदनगरला मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी सकाळीच जामखेडला गेले. ते तेथे २६ मार्चपर्यंत म्हणजे सुमारे १२ दिवस होते. 

नगरमधील मुकुंदनगरच्या अवघ्या काही तासांच्या वास्तव्यातही कोण-कोण त्यांना भेटले, याचीही माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. नगरला तबलिक व सुन्नी जमातचे तज्ज्ञ नेहमी धार्मिक मार्गदर्शनासाठी येत असल्याने व त्यांच्यात बहुतांश परदेशातील तज्ज्ञांचा समावेश असल्याने याविषयी मुकुंदनगरमध्ये कधी कोणाला फारसे विशेष वाटत नाही. 

दरम्यान करोना’बाधीत परदेशी व्यक्ती मुकुंदनगरला थांबल्याचे निष्पन्न झाल्यावर महापालिका व महसूल प्रशासनाने रविवारी रात्री या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषधांची फवारणी केली. शिवाय मुकुंदनगरकडे जाणारे तीन रस्ते तसेच मुकुंदनगर अंतर्गत असलेल्या दर्गा दायरा परिसरातील एक असे चार रस्ते बंद केले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment