कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरमध्ये आणखी तिन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबतचा अहवाल पुणे येथील एनआयव्ही राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून प्रशासनास काल मंगळवारी प्राप्त झाला.

त्यामुळे जिल्हयात कोरोना बाधीतांची संख्या एकूण ८ झाली दरम्यान नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे प्रत्येकाने पालन करावे.

परिस्थीतीचे गांभिर्य ओळखून स्वच्छता राखावी. घराबाहेर पडू नये, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. कोरोना विषाणू आजारास पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

कोरोना लागण असलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सध्या ७ कोरोना बाधीत आयसोलेशन अर्थात विलगीकरण कक्षात निगराणीखाली आहेत. तर, खबरदारीचा उपाय म्हणून ३९४ व्यक्तींना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाचे विशेष लक्ष केंद्रीत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment