Corona Virus Marathi NewsWorld

कोरोना व्हायरसने पाकमध्ये माजविला हाहाकार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   इस्लामाबाद : कोरोना विषाणूने पाकमध्ये अक्षरश: हाहाकार माजविला असून देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मंगळवारी तब्बल १,८७० झाली आहे. कोरोनाने आतापर्यंत २४ जणांचा बळी गेला असून उपचारानंतर देशात ५८ जण बरेसुद्धा झाले आहेत.

देशातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी पाक सरकारने तब्बल १,२०० अब्ज रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

आर्थिक मंदीच्या गर्तेत रुतलेल्या पाकमध्ये १,८७० जणांना लागण झाली आहे. यात प्रामुख्याने पंजाबमध्ये सर्वाधिक ६५८ आणि इराणलगतच्या सिंध प्रांतात ६२७ जण बाधित झाले आहेत.

आदिवासीबहूल खैबर पख्तूनख्वॉमध्ये २२२, बलुचिस्तानात १५२, आझाद जम्मू-काश्मीर-बाल्टिस्तानात १५२ आणि राजधानी इस्लामाबादमध्ये ८ जण कोरोनाग्रस्त झाले आहेत.

इराणमधून भाविक मोठ्या संख्येने आल्याने पाकमध्ये जीवघेण्या कोरोनोचा शिरकाव झाला आहे पाकमध्ये दर्जेदार उपचाराचा अभाव आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे. त्यामुळे भविष्यात पाकला कोरोनाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close