शहरातील ‘त्या’ नगरसेवकांची चमकेगिरी आणि सोशल मीडियातील फोटोसेशनही बंद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- प्रभागांतून धूर व जंतुनाशक फवारणी केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियातून शेअर करण्याची नगरसेवक मंडळींची सुरू असलेली चढाओढ आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यामुळे बंद झाली. नगरसेवकांना जंतुनाशके द्यायची नाहीत, अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

तसेच जंतुनाशक फवारणीनिमित्त गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचा भंग कोणी करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईच्याही सूचना दिल्याने नगरसेवक मंडळींच्या फवारणी उत्साहाला वेसण बसली आहे व सोशल मीडियातील फोटोसेशनही बंद झाले आहे.

नगरसेवक मंडळींकडून सुरू असलेल्या धूर-औषध फवारणीला जिल्हा प्रशासनानेही आक्षेप घेतला होता. १४४ कलम व जमावबंदी आदेश लागू असताना फवारणीसाठी गर्दी जमवण्यासारख्या सुरू असलेल्या प्रकारावर आक्षेप घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचीही तयारी सुरू केल्याचे सांगितले जात होते

तसेच सुरू असलेल्या अशा फवारणीसाठी महापालिकेची परवानगी आहे काय, अशी विचारणाही नागरिकांकडून होत असल्याने आयुक्त मायकलवार यांनी महापालिकेच्या वतीनेच शहरभर जंतुनाशक फवारणीची मोहीम सुरू केली

जंतुनाशकांची फवारणी आवश्यकता असल्यास महापालिकाच करणार व खासगी सोसायट्यांनी स्वतः फवारणी करू नये, असे आवाहन सरकारकडूनही करण्यात आले आहे. ‘करोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध शहरांतील सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलन्यांतून जंतुनाशकांची फवारणी करणे सुरू आहे.

परंतु, या जंतुनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वतः फवारणी करेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment